Shiv Sena  MLA kailas Patil With Farmers  : धाराशिव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांच्या आमरण उपोषणाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. (Kailas Patil's agitation at Dharashiv) जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांनी पीकविमा कंपनीला कारवाईचं पत्र लिहिले आहे. शेतकरी पीक विम्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून आमदार कैलास पाटील यांनी आमरण उपोषण सुरु आहे. 'झी 24 तास' या आंदोलनाचा सातत्यानं पाठपूरावा करत आहे. अखेर सहाव्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेतल्याने आता या आंदोलनात तोडगा निघण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्हयातील शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा, अनुदान आणि ओला दुष्काळ जाहीर करावा या मागण्यांसाठी पाटील हे उपोषण करत आहेत.


धाराशिव शहरात टायर जाळून रास्ता रोको 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. त्यांच्या समर्थनसाठी आज धाराशिव बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला उत्स्फुर्त पाठिंबा मिळत आहे. दरम्यान काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आल्याचे वृत्त आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना हक्काच्या पीक विम्याची रक्कम मिळावी, अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार कैलास पाटील यांनी हे उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनादरम्यान आज धाराशिव शहरात टायर जाळून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच  एसटी बसवर दगडफेकही करण्यात आली.


दरम्यान, काही आंदोलकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केले. काहींनी रास्ता रोको केला तर काहींनी जलसमाधी आंदोलन केलं. उपोषणाला शासन प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर ठाकरे गटानं धाराशिव बंदचं आवाहनं केले आहे.


धाराशीव बंदची हाक


ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज धाराशीव बंदची हाक देण्यात आली आहे.  कैलास पाटलांच्या समर्थनात सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी सोलापूर रस्त्यावर एसटी बसची तोडफोड केली. कैलास पाटलांच्या समर्थनात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी विविध प्रकारची आंदोलनं सुरू केली आहेत. कधी इमारतींवर चढून तर कधी जलसमाधी आंदोलनांची मालिका धाराशीव जिल्ह्यात सुरू आहे. आता धाराशीव बंदची हाक दिल्यामुळे आणि याला शिंदे गटाचा विरोध असल्यामुळे ह्या बंदला हिंसक वळण लागण्याची चिन्ह आहेत. आणि त्यामुळेच प्रशासनाचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.