Sharad Pawar :  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडी लागल्या आहेत. अशातच  शिवसेना शिंदे गटाचे कोरेगाव मतदार संघाचे आमदार महेश शिंदे यांची शरद पवार यांच्यावर तोफ डागली आहे. यशवंत विचारांवर बोलण्याची शरद पवारांची लायकी नाही अशी टीका कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांची यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवारांना यशवंत विचारांचा विसर पडला आहे त्यामुळे यशवंत विचारांवर बोलण्याची शरद पवारांची लायकी नाही अशी टीका कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केली आहे. सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शशिकांत उमेदवारी देण्यात आली आहे.  मात्र, अशा भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या व्यक्तीला शरद पवारांनी उमेदवारी दिल्याने आ.महेश शिंदे यांनी हे आरोप केले आहेत. नवी मुंबई बाजार समितीच्या गाळ्यांमध्ये शशिकांत शिंदे यांनी भ्रष्टाचार केल्याचा महेश शिंदे यांचा आरोप आहे. सातारा लोकसभा मतदार संघात शशिकांत शिंदे यांची उदयनराजे यांच्याशी लढत होणार आहे. 


शशिकांत शिंदे यांच्याविरोधात घोटाळ्याचे आरोप करत सादर केले पुरावे 


आमदार महेश शिंदेंनी मविआचे शशिकांत शिंदे यांच्यावर 4 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. वाशी मार्केट मधील 1 हजार स्क्वेअर फुटाचे गाळे अवघ्या 5 लाखाला विकून भ्रष्टाचार केल्याचं महेश शिंदेनी सांगितले होते. याबाबत न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याबाबत दिलेल्या आदेशाची कागदपत्रेही त्यांनी सादर केली होती. 


महेश शिंदे यांच्या आरोपांना शशिकांत शिंदे यांचे  प्रत्युत्तर


'साता-यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदेंकडून रडीचा डाव केला जात असून, मी दोषी आढळल्यास उमेदवारी अर्ज भरणार नाही' असं वक्तव्य आमदार शशिकांत शिंदेंनी केलंय. नवी मुंबई बाजार समितीच्या गाळे विक्री प्रकरणात 4 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप महेश शिंदेंनी त्यांच्यावर केला होता. त्यानंतर शशिकांत शिंदेंनी हे प्रत्युत्तर दिलंय.