संसदेत विशेषाधिकार हनन प्रस्ताव दाखल करणार-खासदार तुमाने
संसदेत विशेषाधिकार हनन प्रस्ताव दाखल करणार असल्याचं शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी सांगितलं.
नागपूर : स्थानिक खासदार असूनही निमंत्रण नसल्यानं या प्रकाराबद्दल संसदेत विशेषाधिकार हनन प्रस्ताव दाखल करणार असल्याचं शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी सांगितलं.
रामटेक तालुक्यातील कामठी इथं नवनिर्मित विपश्यना केंद्राचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले मंचावर उपस्थित होते.
मात्र रामटेक लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्यानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. कार्यक्रम पत्रिकेत नाव नव्हते, तसेच या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याने कार्यक्रमाला गेलो नसल्याचे खासदार कृपाल तुमाने यांनी सांगितलं.