Neelam Gorhe  :  शिवसेना नेत्या नीलम गो-हे यांनी शिर्डीमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यात शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे चक्क झोपलेले पाहायला मिळालं. शिर्डी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे आपला अर्ज भरण्यापूर्वी, नीलम गो-हे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात राजू वाघमारे गो-हेंच्या शेजारी बसले होते. मात्र वाघमारेंना झोप अनावर झाली होती. त्यामुळे त्यांनी अक्षरशः बसल्या जागी डुलकी घेतली. हा प्रकार गो-हेंच्या लक्षात आल्यावर  नीलम गोऱ्हे यांनी उठा आता... असं म्हणत  वाघमारेंना जागं केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केलाय. सर्वसामान्य माणसाला आपलासा वाटणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा गौरव करत वाघमारेंनी भगवा हाती घेतला. सदाशिव  लोखंडे विरुद्ध मविआचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे अशी लढत होणार आहे. 


सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार सभेत इंदोरीकरांच्या सासुबाईंनी धरला राम गितावर ठेका


अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडेंच्या प्रचारार्थ प्रचार सभा पार पडली. प्रचार सभेत काही भाषणे उरकल्यानंतर प्रभु रामांच्या गितावर महिला आणि कार्यकर्त्यांनी ठेका धरला. यावेळी इंदोरीकरांच्या सासुबाई शशिकला पवार यांनीही राम गितावर ठेका धरला. 


मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणेंनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उमेदवारी अर्ज भरताना स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. ही निवडणूक गावकी, भावकीची नसून, देशहिताची निवडणूक आहे.सलग तिस-यांदा विजय होणारच असा विश्वास बारणेंनी व्यक्त केलाय.