ठाकरे गटाला झटका! आमदार वैभव नाईक आणि राजन साळवी यांची लाच-लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशी
ठाकरे गटाच्या दोन आमदार लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडावर आले आहेत. आमदार वैभव नाईक(Vaibhav Naik ) आणि राजन साळवी(Rajan Salvi) यांची लाच-लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे(Anti-Corruption Department) चौकशी होणार आहे.
Maharashtra Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे(Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray ) टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाच्या दोन आमदार लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडावर आले आहेत. आमदार वैभव नाईक(Vaibhav Naik ) आणि राजन साळवी(Rajan Salvi) यांची लाच-लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे(Anti-Corruption Department) चौकशी होणार आहे.
राजापूरचे आमदार आणि ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी यांना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. येत्या 5 डिसेंबरला मालमत्तेच्या चौकशी संदर्भात हजर राहण्याचे आदेश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत.
आमदार वैभव नाईक यांना देखील लाचलुचपत प्रतिबंधक रत्नागिरी विभाग यांच्या मार्फत सोमवारी 5 डिसेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्ते बाबत केलेल्या तक्रारी नुसार चौकशी करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने आपल्या मालमत्तेच्या कागदपत्रांसाहित व जबाब नोंदणीसाठी रत्नागिरी येथील कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची नोटीस लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नगिरी विभागामार्फत नोटीस बजवण्यात आली आहे.
राजन साळवी लवकरच शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली. आता हे नोटीस प्रकरण नेमकं काय वळण घेणार, याकडं लक्ष लागल आहे.
शिंदे गटात असलेल्या अनेकांची झालेय चौकशी
शिंदे गटात असलेल्या अनेकांची यापूर्वी चौकशी झाली आहे. प्रताप सरनाईक, भावना गवळी, यशवंत जाधव आदी नेत्यांची चौकशी झाली आहे. शिंदे गटात सामील झाल्यानंतर यांना चौकशीतून काहीसा दिलासा मिळाला.