रत्नागिरी : माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेला डिवचल्यानंतर सेनेने तसेच जोरदार प्रत्युत्तर दिलेय. नीलेश राणे यांनी दाडी सोबत केसही वाढवावेत म्हणजे बुवाबाजीसाठी उपयोग होईल, असा टोलाही शिवसेनेन लगावलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीलेश राणेंचा अडीच लाख मतांनी पराभव करणार असे उत्तर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत नीलेश राणेंचा पराभव करणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलंय. त्याचप्रमाणे नीलेश राणे यांनी दाडी सोबत केसही वाढवावेत म्हणजे बुवाबाजीसाठी उपयोग होईल असा टोलाही त्यांनी लगावलाय. नीलेश यांनी सेनेचा पराभव होत नाही, तोपर्यंत दाडी करणार नाही, असा निश्चय केलाय.



नीलेश राणे यांच्या आव्हानाला विनायक राऊत यांनी जोरदार उत्तर दिलेय. राणेंचं शक्तीप्रदर्शनाला महत्व देत नाही. नारायण राणे यांची परिस्थिती म्हणजे ना घर का ना घाट का अशीच झालेय. राणे स्वत:च शिवसेनेकडे नाक घासून येत होते. पणकोणत्याही परिस्थितीत नारायण राणेंना शिवसेनेत प्रवेश नाही, असे विनायक राऊत म्हणालेत.