कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचा जोरदार राडा
सत्ताधारी शिवसेनेने कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त पी वेलारासु यांच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी सेना नागरसेवकांनी आयुक्त दालनात राडा केला. खुर्च्यांची तोडफोडही केली.
कल्याण : सत्ताधारी शिवसेनेने कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त पी वेलारासु यांच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी सेना नागरसेवकांनी आयुक्त दालनात राडा केला. खुर्च्यांची तोडफोडही केली.
शिवसेना नगरसेवकांना आयुक्ताना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली. आयुक्त शिवसेनेवर अन्याय करत असल्याचा आरोप केला.
महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेता राजेश मोरे स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांच्यासह महिला नगरसेविका यांनी जोरदार राडा घातला. त्यामुळे येथील वातावरण तणावग्रस्त होते.
शिवसेनेच्या महिला नगरसेविका कमालीच्या संतप्त दिसून आल्या. आयुक्त दालना बाहेर ठिय्या मांडत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.