मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजप नेत्याकडून होणाऱ्या टीकेला शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला. त्यानंतर त्यांच्यावर चोहोबाजूने होणारा हल्ला परतविण्यासाठी सहकारी खासदार विनायक राऊत आता पुढे सरसावले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासदार विनायक राऊत यांनी आज शिवालय येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नारायण राणे आणि किरीट सोमैया यांच्या जुन्या व्हिडीओ क्लिप दाखवून "डोक्यावर नकली केस आले तरी बुद्धी येतेच असं नाही" असा सणसणीत टोला नारायण राणे यांना लगावला.    


भाजप नेते किरीट सोमैया यांची बाजू घेऊन बोलणारे, त्यांच्या बाजूला बसणारे नारायणे राणे हे सत्तापिपासू आहेत. राणे काँग्रेसमध्ये असताना सोमैया यांनी त्यांच्यावर खूप मोठे आरोप केले होते. राणे यांच्या १०० बोगस कंपन्या असल्याचे आरोप त्यांनी केले होते, असे सांगत राऊत यांनी झी २४ तासची व्हिडीओ क्लिप पत्रकार परिषदेत दाखविली.


कोरोनाकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आघाडीवर होते. देशातील पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा समावेश आहे. मात्र, यात एकही भाजपचा मुख्यमंत्री नाही. हे राणे यांना पाहवत नाही म्हणूनच राणे टीका करत आहेत. नारायण राणे यांच्या मोदी प्रेमाचा कंठ कोडगा आहे. जो बाडगा असतो तोच जास्त कोडगा असतो असे सांगत राऊत यांनी राणेंचा मोदींवर टीका करणारा व्हिडिओच लावला


किरीट सोमय्यांनी राणेंवर आरोप केले होते. राणेंच्या पत्नीच्या नावावर कणकवलीतील निलम हॉटेल आहे. अनेक बेनामी गुंतवणुकीत राणेंचा हात आहे. यासह मायईनिंगमध्येही नारायण राणेंवर आरोप केले. त्याचे पुढे काय झाले अशी विचारणा त्यांनी केली.


संजय राऊत यांच्या आरोपांमुळे अनेक जण घायाळ झाले आहेत. राणे यांना आता भाजपचा पुळका आलाय. पण विधानसभा निवडणुकीत प्रचार करताना त्यांनी मोदींवर काय आरोप केले? सोमैया जवळचे बिल्डर नेते कसे लुबाडत आहे याचे विश्लेषण केले होते ते ऐका. जे वक्तव्य केले त्यापासून कोणी दूर जात नाही, असे ते म्हणाले


संजय राऊत यांचा मुख्यमंत्री पदावरच नाही तर अन्य कोणत्याही मंत्री पदावर डोळा नाही. ते सत्तापिपासू राणेंना कळणार नाही. राणे आणि राऊत यांची दिघंची लायकी बाळासाहेबांना माहित होती म्हणूनच त्यांनी राणे यांना नेते केले नाही असा टोलाही त्यांनी लगावला.