शिवराज्याभिषेक : शिवप्रेमींची अलोट गर्दी, महाड ते रायगड मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
Shivrajyabhishek Din 2023: शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी शिवप्रेमींनी अलोट गर्दी केली आहे. त्यामुळे महाड ते रायगड रोडवर वाहनांची प्रचंड कोंडी झालीय. रायगडाकडे जाणारी वाहतूक थांबवली आहे.
Shivrajyabhishek Sohala 2023: शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी शिवप्रेमींनी अलोट गर्दी केली आहे. त्यामुळे किल्ले रायगडाकडे जाणारे दोन्ही मार्ग पूर्णपणे ठप्प आहेत. महाड ते रायगड रोडवर वाहनांची प्रचंड कोंडी झालीय. ढालघर मार्गे देखील वाहतूक ठप्प आहे. रायगडाकडे जाणारी वाहतूक थांबवलीय. त्यामुळे शिवप्रेमींची वाहनं परतीच्या मार्गावर आहेत. सोहळ्यास उपस्थित राहता येत नसल्याने शिवप्रेमी नाराज आहेत.
किल्ले रायगडावर 350वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज मोठ्या दिमाखात साजरा होतोय. या सोहळ्यासाठी लाखो शिवप्रेमी गडावर उपस्थित आहेत. या सोहळ्याच्या निमित्तानं मेघडबरी आकर्षक फुलांनी सजविण्यात आलीय. ठिकठिकाणी भगवे झेंडे, विद्युत रोषणाई करण्यात आलीय. युवराज संभाजीराजे छत्रपती, शहाजीराजे, संयोगिता राजे गडावर उपस्थित आहेत. शाहिरी पोवाडे आणि गीतांनी गडावर आलेले शिवप्रेमी रंगून गेले. शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी शिवप्रेमींनी अलोट गर्दी केलीय. त्यामुळे किल्ले रायगडाकडे जाणारे दोन्ही मार्ग पूर्णपणे ठप्प आहेत. महाड ते रायगड रोडवर वाहनांची प्रचंड कोंडी झालीय. ढालघर मार्गे देखील वाहतूक ठप्प आहे. रायगडाकडे जाणारी वाहतूक थांबवलीय. त्यामुळे शिवप्रेमींची वाहनं परतीच्या मार्गावर आहेत. सोहळ्यास उपस्थित राहता येत नसल्याने शिवप्रेमी नाराज आहेत.
संभाजीराजे यांचे शिवभक्तांना आवाहन
350 राज्यभिषेक दिन आज रायगडावर साजरा होत आहे. शिव भक्त मोठ्या प्रमाणावर आल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांना आवाहन केले आहे. गडावर गेलेली लोक जोपर्यंत खाली येत नाहीत, तोपर्यंत जिथे आहात तिथं थांबा. जोपर्यंत सर्वांच दर्शन होत नाही तोपर्यंत मी खाली जाणार नाही, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी महाराजांना विनंती केली आहे.अलोट गर्दी झाल्याने प्रशासन बळ कमी पडत आहे.आम्ही नियोजन केले त्यापेक्षा जास्त शिव भक्त गडावर आले आहेत.
शिवाजी महाराज मुंबई विमानतळावर 350 वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळावर 350 वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा साजरा होत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष होत असल्याने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या त्या वेळच्या क्षणाचे महत्व आजही तितकेच आहे. तमाम मराठी जणांसाठी आणि भारतीयांनसाठी अभिमानाची घटना आहे.
स्वराज्य, रयतेचे राज्य ही संकल्पना सर्वप्रथम या जगात छत्रपती शिवाजी महाराज यांनी आणली, हे आजच्या पिढीला कळावं आणि प्रेरणा मिळावी, यानिमित्ताने भारतीय कामगार सेनेच्यावतीने मुंबई विमानतळावर 350 वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा मोठ्या दिमाखात विविध कार्यक्रमाचे आयोजन करत साजरे होत आहे. यावेळी अरविद सावंत, सचिन अहिर यावेळी उपस्थित आहेत.