औरंगाबाद : औरंगाबादेत शिवसेनेच्या वर्धापन दिवसाचा कार्यक्रम झाला. शिवसेनेचा संघटनेचा हा कार्यक्रम होता, मात्र या कार्यक्रमात चंद्रकांत खैरे कमालीचे भावूक झाले. पराभव पाहण्याआधी मी मेलो का नाही?, असा उद्विग्न सवाल खैरे यांनी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही लोक त्या हर्षवर्धन जाधवच्या ट्रॅक्टर मागे गेले यातून काय साध्य झाले?. ज्या माणसाने आई वडिलांचा छळ केला, लोकांचा खून केला, अगदी बायकोचाही हा माणूस छळ करतो, त्याला मदत केली हे आपण पाप केलं असं खैरे म्हणाले. तर खैरेंचा पराभव हा आमचा पराभव असून हा पराभव आमच्या जिव्हारी लागलाय. पुन्हा शहरावर भगवा फडकवणार असल्याचा संकल्प उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला.


p>