Sushama Andhare : `फायर ब्रँड` सुषमा अंधारे परिस्थितीपुढे हतबल, लेकीसोबतचा फोटो पोस्ट करत अश्रू आवरत म्हणाल्या...
Sushama Andhare : विरोधकांवर टीका करताना आपल्या धारदार शब्दांनी त्यांना नमवणाऱ्या सुषमा अंधारे यांच्यापुढे आलेली ही परिस्थिती किती कठीण आहे याचा विचारही करणं अशक्य.
Sushama Andhare : महाराष्ट्राच्या (Maharashtra political News) राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एका आवाजाचाच बोलबाला आहे, तो आवाज म्हणजे ठाकरे गटाच्या उपनेत्या (Shivsena Sushma Andhare) सुषमा अंधारे यांचा. ज्यांना राजकारणात काहीही रस नाही, अशी मंडळीही अंधारे यांच्या भाषणातील प्रत्येक शब्द लक्षपूर्वकरित्या ऐकतात. सर्वसामान्यांतून मोठ्या झालेल्या या नेत्या, सुषमा अंधारे त्यांच्या कर्तव्याला कधीच चुकलेल्या नाहीत. पण, परिस्थितीपुढे हतबल मात्र झाल्या आहेत. कारण, लेकिपासून दूर असण्याची जाणीव त्यांच्याही पोटात खड्डा करून जाते.
'फायर ब्रँड' अशी ओळख असणाऱ्या अंधारे यांनी नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. ही पोस्ट त्यांच्या कोणत्या सभेची किंवा भाषणाची नाही, विरोधकांवर टीका करणारीही नाहीच नाही. ही पोस्ट आहे एका आईला लेकिकडे जाण्यासाठी असलेल्या आतुरतेची. (Sushma Andhare Daughter) मुलीचा वाढदिवस सुरु झालेला असताना आपण कर्तव्याला प्राधान्य देत तिच्यापासून दूर असल्याचं वास्तव अंधारे यांच्या काळजाला पाझर फोडून दिलं आणि त्यांनी शब्दांवाटे भावना व्यक्त केल्या.
हेसुद्धा वाचा : Sushama Andhare: भर सभेत सुषमा अंधारे यांचा अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट; राजकारण ढवळून निघण्याची शक्यता
'शिवगर्जना सप्ताहाच्या सलग सभा सुरु आहेत.. वरळीची सभा संपवून वायुवेगाने मन लेकीकडे धावतंय.....पण लोणावळा घाटातील ट्रॅफिक जणू माझा रस्ता अडवून थांबलंय. दिड दोन तासांपूर्वीचा कणखर लढावू बाणा गळून पडलाय... समोरची अजस्त्र वाहनांची अस्ताव्यस्त ट्रॅफिक बघुन "पराधीन जगती पुत्र मानवाचा " या ओळींची यथार्थता अनुभवतेय. 12 वाजलेत, लेकीचा वाढदिवस आहे. आत्ता या क्षणाला मी तिच्या सोबत असायला हवं. अर्थात् नसले तरी रुसण्या इतकं फुरंगटून बसण्या इतकं कळतं वय तरी कुठे आहे म्हणा..? पण जो वसा हातात घेतलाय तोही तितकाच महत्वाचा...!', असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं.
भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असं म्हणत त्यांनी शिवसैनिकांनी रक्ताच पाणी करुन वाढवलेली शिवसेना बेइमानांच्या कपटजालात अडकली आहे ती सोडवलीच पाहिजे... हा निर्धार पुन्हा एकदा व्यक्त केला आणि घरच्या दिशेनं डोळे लावले. नेहमी धीरानं उभ्या असणाऱ्या अंधारे यांची लेकिप्रती असणारी ओढ आणि त्यांच्या या कणखर व्यक्तीमत्त्वापलीकडून डोकावणारी हळवी आई, यावेळी नेटकऱ्यांच्याही मनात कालवाकालव करून गेली.