अयोध्या : उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा दौरा जाहीर केल्यानंतर श्रीराम मंदिराच्या घोषणा देत शिवसेना नेते रामजन्मभूमी परिसरात दाखल झालेत. परंतु, याच दरम्यान राज्यात सुरू असलेल्या महत्त्वाच्या घडामोडींवरही त्यांचं लक्ष लागून आहे. नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची उचलबांगडी झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. तुकाराम मुंढे स्वत:च्याच प्रेमात पडलेला माणूस असून अशा व्यक्तींमुळे शहरावर कसा परिणाम होतो, हेच या निमित्तानं पाहायला मिळाल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेत्यांनी व्यक्त केलीय. यावेळी, शिवसेना नेते अजय बोरस्तेही उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिक वाचा :- नाशिककर संतापले, पालिका प्रवेशद्वाराबाहेर घोषणाबाजी


तुकाराम मुंढेंचं आम्ही स्वागतच केलं होतं... ते आपला कार्यकाळ पूर्ण करतील, असं शिवसेनालाही वाटत होतं. जेव्हा तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध भाजपनं अविश्वास प्रस्ताव दाखल केला त्यावेळीही शिवसेना मुंढेंच्या बाजूनं उभी राहिली... आणि हा प्रस्ताव हाणून पाडला. परंतु, नाशिककरांवर करवाढ, नाशिकमधलं ७० टक्के बांधकामं अनधिकृत सांगत त्यांनी नाशिककरांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही त्यांच्याशी संघर्ष केला, अशी प्रतिक्रिया अजय बोरस्ते यांनी व्यक्त केली.


अधिक वाचा :- तुकाराम मुंढे यांच्या आतापर्यंत 11 वेळा बदल्या


दरम्यान, नाशिक मगहानगरपालिकेचा कारभार हाताळणाऱ्या आयुक्त तुकाराम मुंढे यांना शासनाकडून बदलीचं पत्र हाती मिळालंय. 'शासनानं आपली बदली केली असून आपली नियुक्ती सह सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय मुंबई या रिक्त पदावर केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार जिल्हाधिकार, नाशिक यांच्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा' असा मजकूर या पत्रात दिसतोय.