गुवाहाटी : शिवसेना नेते आणि उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत गुवाहाटीत पोहचले आहेत. एकीकडे शिंदे गट फुटल्याचा दावा उद्धव ठाकरे समर्थकांकडून केला जात असतानाच शिवसनेचे आणखी एक मंत्री उदय सामंत शिंदे गटात सामील झाले. उदय सामंत सुरतमार्गे गुवाहाटीकडे रवाना झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे उदय सामंत काल शिवसेना कार्यकारिणी बैठकीला उपस्थित होते. पण आता ते गुवाहाटीत दाखल झाले आहेत. उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेत ते आपली भूमिका मांडणार आहेत.


उदय सामंत आज एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने आज शिवसेनेला आणखी एक धक्का बसला. उद्धव ठाकरे यांच्याकडून डॅमेज कंट्रोल सुरु असतानाही आमदार शिंदे गटात पोहेचत आहेत.


एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचा मोठा झटका शिवसेनेला बसताना दिसत आहे. राज्यात शिंदे आणि इतर बंडखोरांच्या विरोधात शिवसैनिकांकडून आंदोलनं सुरु आहेत. 


उदय सामंत यांनी देखील आता ठाकरेंची साथ सोडल्याने ठाकरे गटापुढे मोठं आव्हान उभं राहताना दिसत आहे.