मुंबई : शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केल्याचे शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांना दिली. आम्ही शिवसेना आमदार स्वत: राज्यभरात शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत. तसेच राज्यपालांनी स्वत: पंचनामा करताना उपस्थित राहावे अशी विनंती आम्ही त्यांना केल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्ट मंडळाने राज्यपालांकडे केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रत्नागिरीत नुकसान 


क्यार वादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर प्रशासनाकडून नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे करण्यासाठी सुरवात झालीय.  जिल्ह्यात सुमारे 40 टक्क्यांहून अधिक भातशेतीला फटका बसला असेल असा अंदाज वर्तविण्यात येतोय. ऐन भात कापणीच्या हंगामातच पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा धास्तावला होता.