Who will be CM of Maharashtra: राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा रंगली आहे. महायुतीतील तिन्ही पक्षाचे नेते आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. यादरम्यान शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी यावर भाष्य केलं आहे. जर देवेंद्र फडणवीस यांनी त्याग केला नसता, तर आज हे दिवस दिसले असते का? आजचे अच्छे दिन हे त्या त्यागाचं प्रतीक आहे याची आठवण त्यांनी 'झी 24 तास'शी बोलताना करुन दिली आहे. तसंच वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असेल असंही सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मला जर पक्षाचा आमदार म्हणून किंवा शिंदेचा 30 वर्षांचा सहकारी म्हणून विचारत असाल तर आम्ही दोघांनी महापालिकेत एकत्रित नगरसेवक म्हणून काम केलं. आज ते पाचव्यांदा आणि मी चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलो आहे. सर्वात जास्त मताधिक्याने आम्ही निवडून आलो आहोत. मला सर्वात जास्त 1 लाख 85 हजारांचं मताधिक्क्य मिळालं आहे. या सर्व बाबींचा विचार करता ज्या चेहऱ्याच्या आधारे इतकं भरभरुन मतदान झालं ते पाहता तो चेहरा मुख्यमंत्रीपदी असावं असं आम्हाला वाटतं. शेवटी निर्णय वरिष्ठांचा आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक आहे," असं प्रताप सरनाईक म्हणाले आहेत. 


'मी गेल्या निवडणुकीत त्याग केला होता', महायुतीचं सरकार येताच प्रताप सरनाईकांनी करुन दिली आठवण, 'मंत्रीपद...'


 


"आम्हाला जेव्हा वाटलं नव्हतं तेव्हा मुख्यमंत्रीपदाची गाळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली होती. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अमित शाह यांनी त्यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली जाईल असं सांगितलं होतं. पण अखेर वरिष्ठच निर्णय घेतील," असं प्रताप सरनाईकांनी स्पष्ट केलं. 


पुढे ते म्हणाले, "भाजपाच्या आमदारांना विचारलं तर ते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्वादीचे नेते अजित पवारांना मुख्यमंत्री करा असं सांगतील. त्याप्रमाणे आम्हालाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं. राजकारणात त्याग करावाच लागतो. जनतेला चांगल्या गोष्टी द्यायच्या असतील त्यासाठी त्याग करावा लागतो. जर देवेंद्र फडणवीस यांनी त्याग केला नसता, तर आज हे दिवस दिसले असते का? आजचे अच्छे दिन हे त्या त्यागाचं प्रतीक आहे. भविष्य उज्वल असतं. मला जो एकनाथ शिंदेंचा इतिहास माहिती आहे त्यानुसार त्यागाचं खरं प्रतिक आणि दुसरं नाव एकनाथ शिंदे आहे". 


'100 टक्के कॅबिनेट मंत्रीपद मिळेल'


"ज्या ठाणेकर जनतेला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंना पाहायला आवडेल, त्यांना मलाही मंत्री म्हणून पाहायला आवडेल. गेल्यावेळी मला तसं आश्वासन दिलं होतं. पण काही गोष्टींमुळे ते पूर्ण झालं नाही. पण यावेळी पूर्ण होईल असा विश्वास आहे.  100 टक्के कॅबिनेट मंत्रीपद मिळेल याची मला खात्री आहे. पण त्यागातही चांगले दिवस येतात. गेल्या निवडणुकीत त्याग केला होता, आता करावा लागणार नाही अशी आशा आहे," असा विश्वास प्रताप सरनाईकांनी व्यक्त केला आहे.