मुंबई : सीएए, एनआरसी सारख्या कामांचे धिंडोरे पिटण्यापेक्षा महागाई कमी कशी करता येईल याकडे केंद्र सरकारने लक्ष द्यायला हवे अन्यथा जनतेवर आलेली महागाईची 'संक्रांत' सरकारवर उलटेल अशी बोचरी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून करण्यात आली आहे.  सीएए-एनआरसी वरुन वाद सुरुच राहतील पण यामुळे सामान्य माणसाच्या पदरी अन्नधान्य, नोकरी यापैकी काही पडणार नाही. अच्छे दिन येतील तेव्हा येतील पण किमान 'बरे दिन' होते ते तरी सामान्य नागरिकांना परत द्या असा टोला देखील लगावण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात सर्वत्र महागाईचा भडका उडाला आहे. एकीकके नोकरी नाही तर दुसरीकडे आहे त्या नोकऱ्या देखील गमावण्याची वेळ आली आहे. 'महंगाई डायन मारी जात है !' असे म्हणत सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारने महांगाई डायन मानगुटीवर बसल्याचे ध्यानात ठेवावे. किरकोळ महागाईचा दर चार टक्क्यांच्या जवळपास राहील अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात हा दर ७.३५ टक्क्यांवर गेला. अंदाजाच्या जवळपास दुप्पट महागाई गेली आहे. एकीकडे आर्थिक विकासाचा दर कोसळला तर दुसरीकडे महागाईने उच्चांक गाठला. जागतिक मंदी, अमेरिका-इराण युद्धाचे परिणाम हे यासाठी कारणीभूत असले तरीही केंद्र सरकारकडे याचे उत्तर काय ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. 



२०१४ ला महागाईच्या मुद्द्यावरुन ज्यांनी काँग्रेसला सत्तेपासून दूर केले. ते २०१४ ते २०१९ त्यांचे बहुमताचे सरकार आहे. पण आर्थिक विकासाची घसरण थांबण्याची चिन्ह नसल्याची खंत सामनातू व्यक्त केली आहे.