जळगाव : भाजपचे नाराज झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी नाकारली. मात्र, त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट मिळताच खडसे यांनी बंडाची तलवार म्यान केली. दरम्यान, खडसे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. रोहिणी खडसे यांच्याविरोधात शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरत बंडखोरी केली आहे. त्यामुळे खडसेंसमोर आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे रोहिणी खडसे यांना मोठे आव्हान राहणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात शिवसेना-भाजप युती असताना अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना यांच्या मतदार संघात बदल झाला आहे. ज्या ठिकाणी वर्चस्व आहे. त्या ठिकाणी त्या त्या पक्षा जास्त जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार आणि इच्छूक उमेदवार नाराज आहेत. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून बंडखोरी झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत युतीपुढे आव्हान कायम आहे. दरम्यान, निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अधिक चित्र स्पष्ट होणार आहे.


कोकणात सिंधुदुर्गात युती तुटल्यात जमा आहे. तेथे भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना होण्याची शक्यता वाढलेली दिसून येत आहे. आता जळगाव जिल्हयात भाजप आणि शिवसेनेत वाद उफाळला आहे. भाजपने शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात होता. मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात एकनाथ खडसे यांच्याविरोधात शिवसेनेचे नेते चंद्रकांत पाटील लढा देत होते. २०१४ च्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी खडसेंच्या मोठे आव्हान उभे केले होते. खडसे केवळ ९७०० मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे यावेळी शिवसेनेला येथील जागा मिळेल अशी शक्यता होती.


मात्र, खडसेंनी बंडाचे निशाण फडकविल्याने त्यांच्या मुलीला पक्षाने उमेदवारी दिली. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना टक्कर देण्यासाठी जोरदार तयारी केली. मात्र, खडसेंच्या कन्येला तिकीट दिले गेल्याने शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांनी रोहिणी खडसे यांना शह दिल्याची चर्चा आहे.