अपक्ष अर्ज दाखल करणाऱ्या शिवसेनेच्या सहसंपर्क प्रमुखाची हकालपट्टी
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आदेश
भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे सुरेश बाळा मामा म्हात्रे यांची शिवसेना सहसंपर्क प्रमुख, भिवंडी लोकसभा या पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसे आदेशच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. बाळा मामा यांच्या बंडखोरी संदर्भात मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यानंतर बाळा मामावर तात्काळ कारवाई करण्यात आली.
अनेक ठिकाणी बंडखोरीमुळे अनेक अधिकृत उमेदवारांना झटका बसण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी इच्छूकांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. सगळ्याच पक्षांसमोर बंडखोरी शमवण्याचं करण्याचं आव्हान असतं.