रत्नागिरी : नाणार प्रकल्पाविरोधात आता शिवसेनेनी रस्त्यावरच्या लढाईची हाक दिलीय. कारण शिवसेनेनी या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी उद्या संघर्ष यात्रेची हाक दिलीय. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात हि संघर्ष यात्रा असणार आहे. नाणार या प्रकल्पाला विरोध कऱण्यासाठी ही संघर्ष यात्रा डोंगर तिठा इथून सुरू होईल आणि चौके या गावापर्यत जाणार आहे. खासदार विनायक राऊत या संघर्ष यात्रेचं नेतृत्व करणार आहेत.