मुंबई : गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत विरुद्ध किरीट सोमय्या वाद सुरू आहे. भोंग्याचा वाद, किरीट सोमय्या अशा सगळ्यानंतर आता राजकीय वर्तुळातील सर्वात मोठी बातमी येत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आज मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राऊत यांनी काल रात्री एक ट्वीट करत हा इशारा दिला. 'संकल्प भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राचा' असं भाजपचं बॅनर राऊतांनी ट्वीट करत 'उद्यापर्यंत थांबा' असा इशारा आपल्या ट्वीटमधून दिला. 


त्यामुळे राऊत आज कोणता मोठा गौप्यस्फोट करणार, राऊत यांच्या निशाण्यावर आज कोण असणार याची उत्सुकता आहे. राऊतांनी आपल्या ट्वीटमध्ये किरीट सोमय्या, भाजप, पीएमओ, अमित शाह, ममता बॅनर्जी, देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांना टॅग केलं आहे. 





संजय राऊत आता नेमका काय गौप्यस्फोट करणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. त्यांनी ईडीला टॅग केल्यानं यासंदर्भात काही गौप्यस्फोट असेल का? अशी चर्चाही सुरू झाली आहे. संजय राऊत यांच्या गौप्यस्फोटाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.