हेमंत चापुडे, झी मिडीया, पुणे: अभिनेत्री मानसी नाईक यांच्या छेडछाड प्रकरणाशी युवासेनेचा काहीही संबंध नसल्याचे शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 5 फेब्रुवारी रोजी युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात रांजणगाव या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मानसी नाईक परफॉर्मन्स करण्यासाठी आलेल्या असताना त्यांच्याशी एका अज्ञात व्यक्तीने छेडछाड केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणी मानसी नाईक यांनी मुंबईतील साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाशी युवासेनेचा काही संबंध नसून शिवसेनेला नाहक बदनाम करू नये असे आढळराव पाटील यांनी सांगितले. छेडछाड करणाय्रा व्यक्तिशी शिवसेनेचा काहीही सबंध नसून तो डान्स करणाय्रा टिम मधीलच कलाकार असल्याचे ही आढळराव पाटील यांनी सांगितले. (छेडछाड : मी गप्प बसणार नाही, मी महाराष्ट्राची मुलगी आहे - मानसी नाईक)


अभिनेत्री मानसी नाईकसोबत छेडछाडीची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये युवासेना जिल्हा प्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा प्रकार झाला. याबाबत मानसीने मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एका अज्ञात व्यक्तीने मंचाजवळ जाऊन धमकवण्याचा प्रयत्न केल्याचे मानसीने या तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


हे प्रकरण माझ्यापर्यंत होते तोपर्यंत मी काहीही बोलले नाही. मात्र, माझ्या आईला धमकविण्याचा प्रयत्न झाला आहे. आज महिलांबाबत अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे महिलांनी पुढे आले पाहिजे. मी महाराष्ट्राची मुलगी आहे. मी घाबरणार नाही, मी गप्प बसणार नाही, असे तिने तक्रार दाखल केल्यानंतर स्पष्ट केले.