Shivsena Symbole : पहिली ठिणगी पडली, दापोलीत शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा
शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर कोकणात ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं.
Maharashtra Politics : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) धनुष्यबाण (Dhanushyaban) आणि शिवसेना (Shivsena) पक्ष एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे देण्याचा निर्णय दिला आहे. त्यानंतर आता पहिली ठिणगी पडली आहे. दापोलीत (Dapoli) शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गटात (Thackeray Group) राडा झाला. एकमेकांवर खुर्च्या फेकण्यापर्यंत दोन्ही गटात गदारोळ झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पांगवलं.
केंद्रीय आयोगाने निकाल दिल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते दापोलीतील मुख्य बाजारपेठेतील शिवसेना शाखेचा (Shivsena Shakha) ताबा घेण्यासाठी गेले. शाखेत उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते बसले होते. दोन्ही गटातले कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर बाचाबाची सुरुवात झाली. दोन्ही गटातले कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. पोलिसांनी वेळीच धाव घेत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना वेगळं केलं. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गटाने या शाखेचा ताबा घेतलाय. याआधीही या शाखेवरुन दोन्ही गटात वाद झाला होता.
सध्या इथे तणावपूर्ण वातावारण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
ठाकरे गटाकडून चिन्ह आणि पक्ष गेला
'धनुष्यबाण' हे चिन्ह आणि 'शिवसेना' हे पक्षाचं नाव ठाकरे कुटुंबाकडून कायमचं निसटलंय.. जे नाव आणि जे चिन्हं ठाकरेंची ओळख होती.. ते आता शिंदेंच्या मालकीचं झालंय. निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि चिन्हावर निर्णय दिला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली.. आजवर अनेक नेत्यांनी शिवसेना सोडली....बंड केलं....बाहेरच्यांसोबत घरातूनही बंड झाली. मात्र शिंदेंच्या बंडानं ठाकरेंच्या अस्तित्वावर घाला घातला अन् आता तर शिवसेना नाव आणि शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण ही ओळखच आता ठाकरेकडून हिरावली गेलीय. त्यामुळे राज्यातील पुढील राजकारण कशी दिशा घेणार हे पाहणं औत्सुकाचं ठरणार आहे.