पुणे : अयोध्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी आज उद्धव ठाकरे शिवरायांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी गडावर जाणार आहेत. गडावर महाराजांचं दर्शन घेऊन ते शिवजन्मभूमीची पवित्र माती आणि मंगल कलश घेऊन आयोध्येकडे रवाना होतील. हा मंगल कलश ते अयोध्येत महंतांच्या हाती देतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे अयोध्येत उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याची जोरदार तयारी सुरु आहे. लक्ष्मण किला या अयोध्येतल्या परिसरात उद्धव ठाकरेंचा जनसंवादाचा कार्यमक्रम आहे. त्या परिसरातच बुधवारी शिवसेना खासदार संजय राऊत, विनायक राऊत, आणि एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत महंतांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आलय. 


याशिवाय अयोध्येत येण्यासाठी कुणाच्या परवानागीची गरज नाही, असंही संजय राऊत यांनी 'झी २४ तास'शी बोलताना स्पष्ट केलंय. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमात ऐनवेळी बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.