रत्नागिरीतून शिवसेनेचे उदय सामंत, तर कणकवलीतून नितेश राणे विजयी
कोकणात रत्नागिरीतून उदय सामंत यांनी तर सिंधुदुर्गातून नितेश राणे तर श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनी विजय मिळवला आहे.
मुंबई : कोकणात रत्नागिरीतून उदय सामंत यांनी तर सिंधुदुर्गातून नितेश राणे तर श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनी विजय मिळवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेला चांगले यश मिळत असले तरी चिपळूणची जागा गमविण्याची भीती आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी शेखर निकम यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली आहे. त्यामुळे येथे शिवसेनेला जोरदार धक्का मानला जात आहे. मात्र, रत्नागिरीत निर्विवाद उदय सामंत यांनी आपला विजय साकारला आहे. त्यांच्यासमोर विरोधकांचे तितकेसे आव्हान नव्हते. उदय सामंत यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली आहे.
तर शिवसेनेने खेड-दापोली येथील जागा खेचून आणताना दिसून येत आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पूत्र योगेश कदम यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली. येथे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संजय कदम यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. तर राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले भास्कर जाधव यांना गुहागरमधून राष्ट्रवादीचे सहदेव बेटकर यांनी जोरदार टक्कर दिली आहे. या ठिकाणी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. जाधव यांना मोठी आघाडी घेता आलेली नाही. त्यामुळे येथे त्यांची दमछाक होताना दिसून येत आहे. दरम्यान, राजापूर येथेही कडवी लढत पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे राजन साळवी यांनी सुरुवातीला आघाडी घेतली होती. त्यानंतर भाजपचे
तर सिंधुदुर्गात भाजपमध्ये दाखल झालेले आणि भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे नारायण राणे यांचे पूत्र नितेश राणे यांची विजयाकडे वाटचाल दिसून येत आहे. त्यांनी प्रथमपासून आघाडी घेतली होती. अकाव्या फेरीतही त्यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे ते एक पाऊल विजयापासून लांब आहेत.