जुन्नर : कल्याण-नगर महामार्गावर जुन्नर तालुक्यातील ओतूर इथं वाहनाच्या धडकेत बिबट्या जबर जखमी झाला. रात्री उशीरा ही घटना घडली असून माणिकडोह बिबट निवारा केंद्राचं बचाव पथक आणि जुन्नर वनविभागाच्या वनकर्मचा-यांनी तातडीनं जखमी बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन पुढील उपचारासाठी बिबट्याला माणिकडोह निवारण केंद्रात दाखल केलं.


वन्यप्रेमींची नाराजी 


 मागील काही दिवसात जुन्नर तालुक्यात पुणे-नाशिक आणि कल्याण-नगर महामार्गावर भरधाव वेगानं धावणाऱ्या वाहनांच्या धडकेमुळे रात्रीच्या वेळी बिबटे मृत्यूमुखी पडण्याचे आणि जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर वन्यप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.