अनिरुद्ध दवाळे, अमरावती : रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णाच्या मनात आपण बरे होऊन परतू अशी आशा असते. पण, अमरावती येथील एका रुग्णालयात घडलेल्या घटनेमुळं रुग्ण बरं होणं सोडा, पण त्याच्या आजारपणात आणखी भरच पडत चालल्याचं पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्धांगवायू गेलेल्या रुग्णाला काल रात्री पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर गुरुवारी सकाळी त्या रुग्णाला नातेवाईक भेटायला गेले असता एक धक्कादायक प्रकार समोर आला. 


अमरावतीत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाला लाल मुंग्यांचा चावा घेतला होता. रुग्णाच्या गुप्तांग, डोळे, पाठ आदी भागात मुंग्यांनी चावा घेतल्याने जखमा झाल्या. 


मुंग्यानी चावा घेतल्याने रुग्णाचा एक डोळा निकामी होण्याची भीती नातेवाईकांनी व्यक्त केली


नातेवाईकांनी विचारणा केली असता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून रुग्णाच्या नातेवाईकाशी वाद घालण्यात आला अशी माहितीही समोर येत आहे. 



विष्णुपंत साठवणे असं उपचार घेत असलेल्या रुग्णाचं नाव आहे. सध्या या रुग्णाला नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केलं असल्याचं कळत आहे.