Maharashtra News : महाराष्ट्रातील लातूरमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. लातूरमध्ये महिला सरपंचाला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोंडल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आलाय. चाकूर तालुक्यातील शिवणखेडमध्ये हा प्रकार घडलाय. सरपंच बायनाबाई साळुंके या ग्रामपंचायत कार्यालयात बसले असताना अचानक तिथे गावातील नागरिक आलेत आणि त्यांनी त्यांच्यावर दमदाटी करण्यास सुरुवात केली. बांधकाम कामगार योजनेच्या फॉर्मवर सह्या करण्यासाठी गावातील सर्व नागरिकांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला होता. (Shocking case with female sarpanch in Latur sarpanchas was locked up into gram panchayat Office)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला सरपंच बायनाबाई साळुंके यांनी बांधकाम कामगार योजनेच्या फॉर्मवर सह्या न करण्यास नकार दिल्यानंतर गावकरी आक्रमक झाले. या मोर्चातील सुरज साके या व्यक्तीने सरपंच बायनाबाई साळुंके यांना चक्क ग्रामपंचायत कार्यातलायत कोंडूत कार्यालयाला कुलूप ठोकलं होतं. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेची सुटका केली. दरम्यान या प्रकरणी लातूरच्या चाकूर पोलीस ठाण्यात आरोपी सुरज साके याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महिला सरपंच बायनाबाई साळुंके यांची प्रतिक्रिया 


या घटनेवर प्रतिक्रिया देताना महिला सरपंच बायनाबाई साळुंके म्हणाल्या की, 'सुरज साके यानी ऑफिसमध्ये येत माझ्यासोबत दबाव टाकू लागले. त्यावर मी विचारलं की काय झालं. तर म्हणाले मला कागदावर सह्या पाहिजे. मग मी विचारलं कशासाठी? बांधकाम कामगार योजनेच्या फॉर्म आहे असं सांगितलं. त्यावर मी म्हटलं तुम्ही स्वत: पूर्ती बोला. गावातील सगळ्या लोकांचे फार्म का आणलेत. त्यानंतर ते घरी गेले आणि तिथून कुलूप आणून मला ग्रामपंचायत कार्यालयात बंद केले. मी जवळपास 45 मिनिटं कार्यालतात बंद होती. त्यानंतर मी पोलिसांना फोन केल्यावर माझी सुटका झाली.'



महाराष्ट्रातील गावांमध्ये असे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येत असतात. ग्रामपंचायत सरपंच असो किंवा सरकारी अधिकारी असो. त्यांनी गावातील कुठली योजना किंवा सरकारी कामामध्ये दिरंगाई केल्यास गावातील लोक आक्रमक होतात. मग मोर्चा आणि अधिकाऱ्याला मारहाण, तर कधी ऑफिसमध्ये कोंडून ठेवणे एवढंच नाही तर कधी कधी त्यांच्यावर शाईदेखील फेकली जाते. अशावेळी गावातील स्थानिक पोलिसांवर या घटना रोखण्यासाठी तणाव येतो.