धक्कादायक! बापाने मुलाला तृतीयपंथीयाला विकले
परिसरात एकच खळबळ उडाली
प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : शहरातला धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. व्यसनाधीन बापानं दहा वर्षांच्या मुलाला विकण्याचा प्रकार केला आहे. बापानेच मुलासोबत असं कृत्य केलं आहे. यामुळे परिसरातील चर्चेचा विषय बनला आहे. उत्तम पाटील असं मुलाला विकणाऱ्या बापाचे नाव आहे.
मुलाचे वडील चांदी कारागीर असूनही व्यसनांच्या आहारी गेले होते. अशा परिस्थितीत मुलाचा सांभाळ करणं कठीण बनल्याने पोटच्या मुलाला तृतीयपंथीयाला विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नोटरी द्वारे दत्तक करून मुलाला विकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
कोरोनाच्या काळात काम नसल्यामुळे व्यसनाधीन झालेल्या बापाने हा प्रकार केला आहे. उत्तमच्या पत्नीलाही मानसिक आजाराची लागण झाली आहे. तर वृद्ध आई-वडील अशी कुटुंबाची व्यवस्था असताना बापाला मुलगा जड झाल्याने त्याने हा प्रकार केला आहे.
नातू कुठे दिसत नसल्यामुळे उत्तम पाटील यांच्या सासूने अनेकदा विचारणा केली. पण उत्तम पाटलांनी उडवा उडवीची उत्तर दिली अशा वेळी सासूला संशय आल्याने तिने सामाजिक संस्थेत धाव घेतली. आणि हा प्रकार उघडकीस आहे.
पन्हाळा तालुक्यातील काटे भोगाव येथील उत्तम जोतीराम पाटील या युवकाचा माजगाव येथील एका युवतीशी 17 वर्षापूर्वी विवाह झाला असून, या दाम्पत्याला दोन मुले आहेत. शहरातील एका चांदी उद्योजकाकडे उत्तम चांदी कारागीर म्हणून काम करतो.
कामानिमित्त अनेक वर्षांपासून आई-वडीलाच्या समवेत उत्तम कोल्हापूरात राहतो. सध्या तो गंगावेश परिसरातील सावंतवाडा येथे राहत आहे. पत्नीला मानसिक आजाराची लागण झाली.औषध उपचार केले. पण त्यांचा काहीही उपयोग झाला नाही, मोठा मुलगा स्वतःकडे ठेवून घेवून, त्यांने मनोरुग्ण पत्नी आणि लहान मुलाचा सांभाळ करण्यासाठी सासरवाडीला पाठविले. दत्तक घेण्याचा कार्यक्रम लॉकडाऊनमध्ये मे महिन्यात झाल्याचे उघड्याचं समोर आलं.