कोल्हापूर : कोल्हापूरात अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे. औषधांचा खर्च परवडत नसल्यानं पित्यानं मुलाला पंचगंगा नदीत फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कबनूरमधली धक्कादायक घटना आहे. पित्यानं पंचगंगेत फेकलेल्या 5 वर्षांच्या अफानचा शोध सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्दयी बापाने पोलिसांसमोर या घटनेची कबुली दिली आहं. अफांन सिकंदर मुल्ला असं या मुलाचं नाव आहे. या प्रकरणा पिता सिकंदर हुसेन मुल्ला वय वर्षे 48 यांना ताब्यात घेतलं आहे. मुलाचा शोध घेण्याच काम केलं जात आहे. गेल्या दोन महिन्यातील तिसरी घटना आहे. 


सिकंदर मुल्ला हे अपंग असून मजुरीचे काम करतात. दारूचे व्यसन देखील असल्यामुळे ते घराबाहेरच असतो. दहा वर्षाची मुलगी आणि अफान अशी दोन मुले आहेत. गेल्या काही महिन्यापासून त्यांच्या कुटुंबात वाद सुरू आहे. अफान याला फिट्सचा आजार असल्याने औषधाचा खर्च कुटुंबाला परवडत नाही. यावरून तणावाच वातावरण होतं. 


गुरूवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुलाला उपचारासाठी जावूया असं सांगून अफानला घेऊन घराबाहेर पडले. रात्री घरी आल्यानं त्याने मुलाला पंचगंगेत फेकल्याचं सांगितलं. मात्र नातेवाईकांनी विश्वास ठेवला नाही. बराच वेळ घरी न आल्याने पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे.