निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे : महिलांवरील वाढते अत्याचार थांबवण्यासाठी प्रशासन कठोरातील कठोर पावलं उचलण्यासाठी प्रयत्नशील असतानाच काही हादरवणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील गुन्हेगारी कृत्यांमध्ये आता आणखी एका गंभीर प्रकरणाची भर पडली आहे. जिथं, चौघांकडून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Pune News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील एका महाविद्यालयातील मुलांनी अल्पवयीन मुलीवर करण्यात लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जनजागृती दरम्यान पोलिसांच्या समुपदेशनपर कार्यशाळेदरम्यान हा प्रकार उघडकीस आल्याचं सांगितलं जात आहे. सदर धक्कादायक प्रकार समोर येताच याप्रकरणी पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, अन्य दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 


... त्यांनी व्हिडीओ व्हायरल केला 


पुण्यातील उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात एका 16 वर्षीय मुलीवर तिच्याच ओळखीच्या 4 मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. या मुलीवर अत्याचार करून तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत तिची बदनामीही करण्यात आली. याप्रकरणी पीडित मुलीने दोन सज्ञान आणि दोन अल्पवयीन आरोपींविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.


हेसुद्धा वाचा : धावत्या एसटीमध्ये सासू सासऱ्यांनीच केला जावयाचा खून, एसटी स्टँडवर फेकला मृतदेह


 


ओम घोलप (20), स्वप्निल गाडेकर (20) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून दोन आरोपी अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनीच्या माहितीनुसार आरोपींनी एप्रिल 2024 ते 12 सप्टेंबरदरम्यानच्या काळात या मुलीसोबत बळजबरीनं शारीरिक संबंध ठेवले. या घटनेचे व्हिडिओ काढून तसेच दुसऱ्या अल्पवयीन मुलाने पीडित मुलीचे अर्धनग्न फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तिला दिली. आरोपींनी या मुलीवर वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार अत्याचार केले, तिचे व्हिडीओही व्हायरल केले. ज्यामुळं अनेक अनोळखी लोकांनी तिला मेसेज करत शारीरिक सुखाची मागणी केल्याची धक्कादायक बाब मुलीनं तक्रारीत नमुद केली.