पालघर : काही तरुण अति उत्साह किंवा रातोरात प्रसिद्ध होण्यासाठी जीवघेणा स्टंट करत असतात. एका तरुणानं आता एक जीवघेणा आणि क्रूर स्टंट केला आहे. या तरुणानं क्रूरतेचा कळस गाठला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकू शकतो. हा व्हिडिओ एका तरूणाचा आहे. तो सापासोबत जीवघेणा खेळ खेळत आहे. हातात चक्क साप पकडून तो दोरीच्या उड्या मारत आहे. 



हा व्हिडिओ पालघरमध्ये व्हायरल झाल्याची माहिती मिळत आहे. कोणीही असा आततायी प्रकार करू नये. यामुळे जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसंच प्राण्यांवर अत्याचार करणं हा कायद्यानंही गुन्हा आहे. तर सर्पमित्रांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे.


या व्हायरल व्हिडीओमुळे आता संताप व्यक्त केला जात आहे. अशा प्रकारचं धाडस तरुणांनी करू नये. हे धाडस जीवावर बेतू शकतं त्यामुळे अशा प्रकारे स्टंट करू नका.