अमरावती : एक धक्कादायक माहिती. अमरावतीत माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्या महाविद्यालयामधील ही धक्कादायक घटना आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गेटची रंगरंगोटी करत असताना हायटेन्शन तारांचा करंट लागला. विजेचा उच्चदाब असल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. (Four killed electric shock in Amravati)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, शवविच्छेदनासाठी चौघांचेही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी दिली.


माजी राज्यमंत्री आणि भाजपचे आमदार प्रविण पोटे यांच्या इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराचे रंगकाम करण्यासाठी महाविद्यालय प्रशसनाने बाहेरुन मजूर न बोलावले नाहीत, अशी माहिती पुढे येत आहे.


रंगकाम कामासाठी महाविद्यालयामधील कर्मचाऱ्यांना हे काम दिल्याचे सांगण्यात येत आहे. हे कर्मचारी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर रंगरोटी करत होते. यावेळी ही मोठी दुर्घटना घडली.


गेटची रंगरंगोटीसाठी लोखंडी शिडीवर कर्मचारी चढले. यावेळी विजेच्या तारा असल्याने या तारेचा धक्का लागल्याने चारही जणांना विजेचा धक्का बसला. विजेचा झटका इतका मोठा होता की, कर्मचारी गंभीर जखमी झालेत आणि त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 


या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. शॉक लागून मृत्यूमुखी पडलेले कर्मचारी हे शिपाई पदावर कार्यरत होते, अशी माहिती मिळत आहे.