बीड : Yatra Accident in Beed :दोन वर्षांनी भरली यात्रा भरली. मात्र, एका चुकीमुळे यात्रेला गालबोट लागले आहे. यात्रेवरच शोककळी परसली आहे. पारंपरिक प्रथा जोपासत रथ ओढतांना 14 वर्षीय मुलगा रथाच्या चाकाखाली चिरडला गेला. यामध्ये मुलाचा मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीडच्या जरुड गावातील धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनानंतर दोन वर्षानंतर भरलेल्या यात्रेत मोठा उत्साह दिसून येत होता. देवाचा पारंपारिक रथ ओढताना 14 वर्षीय चिमुरडा रथाच्या चाकाखाली चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू  झाला. परमेश्वर नागनाथ बरडे (14 रा. जरुड) असे या मुलाचे नाव आहे.


बीडपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जरुड गावात, प्रतिवर्षी जागृत देवस्थान असणाऱ्या भैरवनाथाची यात्रा भरते. या यात्रेसाठी पंचक्रोशीतील गावातून हजारो भाविक भक्त यात्रेसाठी येत असतात. मात्र गत दोन वर्षांपासून कोरोनाने यात्रा उत्सवावर बंदी असल्याने यात्रा भरली नव्हती. यंदा सर्वच निर्बंध शिथिल झाल्याने मोठ्या उत्साहात यात्रा भरली होती. 



यावेळी आयोजित यात्रेत परंपरेने भैरवनाथाचा रथ ओढला जातो. यंदा देखील हा रथ ओढत असतांना प्रचंड गर्दी झाली होती. लहान लहान मुलांसह वृद्ध देखील रथ ओढत होते. याचवेळी परमेश्वर बरडे हा मुलगा रथ ओढत असतांना खाली पडला अन त्याच्या अंगावरुन रथाचे चाक गेले. यातच त्याचा जाग्यावर मृत्यू झाला. दरम्यान या घटनेने भाविक भक्तांसह पंचक्रोशीतील नागरिकांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.