Pune News: पुण्यात धक्कादायक घटना, होर्डिंग कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू!
Pune Shocking incident News: पिंपरी चिंचवडमधील रावेत (Rawet) भागात होर्डिंग कोसळून 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. काही वेळापूर्वीच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. तेव्हा, हा होर्डिंग कोसळून (billboard collapse) यात 8 जण अडकले होते.
Pune Accident News: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात (Pune Rains) मुसळधार पावसाचा सपाटा सुरू असल्याचं चित्र आहे. अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) नोकरधारांना प्रवास करताना अडचणीचा सामना करावा लागतोय. तर काही ठिकाणी झाड कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. अशातच आता पुण्यातून धक्कादायक माहिती (Shocking incident in Pune) समोर आली आहे. पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) भागात होर्डिंग कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पिंपरी चिंचवडमधील रावेत (Rawet) भागात होर्डिंग कोसळून 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. काही वेळापूर्वीच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. तेव्हा, हा होर्डिंग कोसळून (billboard collapse) यात 8 जण अडकले होते. त्यापैकी 3 जणांची सुटका करण्यात आली होती. 8 पैकी 4 ते 5 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती रावेत (Pune Police) पोलिसांनी दिली आहे.
मावळात आलेल्या वादळी पावसाने रावेत किवळे येथील कात्रज बायपास जवळच्या सर्व्हिस रोडवर जाहिरातीचा फलक कोसळला. तात्काळ देहूरोड पोलीस आणि रावेत पोलिसांच्या टीमने स्थानिक नागरिक आणि पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या मदतीने या लोकांना बाहेर काढले. जखमींना खासगी रुग्णालयात केलं दाखल आलं आहे. पाऊस येत असल्याने काही लोक आडोशाला थांबले होते, त्यावेळी ही घटना घडली आहे.
आणखी वाचा - Ajit Pawar: अजितदादांचा काही नेम नाय, कुणकुण लागली आता दिवसाढवळ्या शपथपिधी?
सततच्या होणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मुकाई चौकात वाहतूक पोलिसांच्या चौकीच्या पाठीमागे झाडपडी येथे ही घटना घडली आहे. पावसाच्या माऱ्यामुळे अनेक ठिकाणी होर्डिंग फाटल्याचे दिसून आले, तर काही ठिकाणी वीज देखील गेल्याचं दिसतंय. अशातच आता होर्डिंग कोसळून मृत्यू (4 people died due to billboard collapse) झाल्याने प्रशासनावर सवाल उपस्थित केले जात आहेत.