Shocking News: पालकांना सावध करणारी मोठी बातमी समोर आली आहे. चॉकलेट घशात अडकून एक वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. साताऱ्यात(Satara News) ही दुर्दैवी घटना घडली आहे. आई-वडिलांच्या डोळ्या समोर हा प्रकार घडल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली(Shocking incident) आहे. तसेच मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज असल्याचा मुद्दा देखील अधोरेखित  झाला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारा शहरातून ही मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चॉकलेट घशात अडकल्याने दीड वर्षाच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला. मुलीच्या आईने चिमुकलीला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच चिमुकलीने आपला जीव सोडला. 
मृत मुलीच्या आईने तीला चॉकलेट खायला दिले होते. याच चॉकलेटने मुलीचा घात केला. 


मात्र, हे चॉकलेट मुलीच्या घशात अडकले. मुलीचा श्वास कोंडला. आईने तात्काळ तिला रुग्णालयात नेले.  घशात चॉकलेट अडकून मुलीचा मृत्यू झाल्याने तिच्या आईने आक्रोश केला. या मातेचा आक्रोश अक्षरश:काळीज पिळवटून टाकणारा होता. 


सातारा शहरातील कोडोली भागात ही दुर्दैवी घटना घडली आहे.  मृत मुलगी कर्मवीर नगर येथे राहणारी आहे. जेली चॉकलेट घशात अडकल्याने एक वर्षाच्या लहान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मुलीच्या आईने चिमुकलीला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच चिमुकलीने मृत्यू झाला आहे. शर्वरी सुधीर जाधव असे मृत चिमुकलीचे नाव आहे. ही काल रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे.


चिमुकल्या शर्वरीला तिच्या शेजारी राहणाऱ्या एका लहान मुलीने जेली चॉकलेट खाण्यास दिले होते. हे चॉकलेट तिने स्वत: गिळले. परंतु चॉकलेट तिच्या घशात अडकल्याने तिला श्वास घेण्यास त्रास होवु लागला . 
यानंतर ती बेशुद्ध पडली. तिच्या आईने हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने शर्वरीला सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी तिला तपासले असता ती मृत झाल्याचे सांगितले. घशात जेली चॉकलेट अडकून मुलीचा मृत्यू झाल्याने तिच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली.


 


लहान मुलांना चॉकलेट खायला देताना काळजी घ्या


चॉकलेट म्हणजे लहान मुलांचा आवडता विषय. लहान मुलं चॉकलेट आवडीने खातात. मुलं रडयाला लागंल की आई वडिल त्यांना चॉकलेट देऊन शांत करतात. अनेकदा लहान मुलांकडून चॉकलेट गिळले जाते. या चॉकलटेमुळेच शर्वरीचा बळी गेला आहे. यामुळे लहान मुलांना चॉकलेट खायला दिल्यानंतर लहान मुलांवर लक्ष ठेवणे गरजे आहे.