`या` गावात ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान घडला धक्कादायक प्रकार
Mahad News: महाडमधील कोळोसे ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत जादुटोण्याचा वापर करण्याचा प्रकार घडला असून याबाबत ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी केली जात आहे.
Mahad News: महाडमधील कोळोसे ग्राम पंचायतीच्या (gram panchyat) निवडणुकीत जादुटोण्याचा वापर करण्याचा प्रकार घडला असून याबाबत ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी केली जात आहे. गावातील वाड्यांवर टाचण्या रोवलेले लिंबू ठेवले होते. महाड तालुक्यातील कोळोसे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व वाड्यांवरील रस्त्यालगत, घरांच्या अंगणात, नाक्यावर लिंबू टाकण्यात आले आहेत. टाचण्या रोवलेले हे लिंबू कुठे एक, कुठे दोन कुठे तीन असे टाकले आहेत. ग्रामस्थांच्या हा प्रकार निदर्शनास आला. सुरूवातीला ग्रामस्थांनी याकडे दुर्लक्ष केले मात्र गावच्या सर्वच वाड्यांवर लिंबू टाकण्यात आल्याचे समजल्यानंतर ग्रामस्थांमधुन संताप व्यक्त होत आहे. ग्राम पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बुधवारी रात्री अज्ञात इसमाने अंधश्रद्धेचा हा खेळ खेळला असल्याचा ग्रामस्थांचा आरोप असुन त्याचा शोध घ्यावा अशी मागणी केली जात आहे. (shocking incidents happened in gram panchyat nivdnuk at mahad)
आंबेगाव तालुक्यात निवडणूकीचा धुरळा
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा धुरळा उडणार असून 18 डिसेंबर रोजी या ग्रामपंचायतीचे मतदान होणार आहे. थेट जनतेतून सरपंच निवड होणार असल्याने या ग्रामपंचायत निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे,मात्र ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्यासाठी अडचणी येत असल्याने निवडणूक आयोगाने ऑफलाइन पद्धतीने ही आज साडेपाच पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुभा दिली आहे.
हेही वाचा - Weather News: राज्यात पारा घसरुन 9.5 अंशांवर; जाणून घ्या हिवाळी सहलीसाठीची सर्वोत्तम जागा
ग्रामपंचायत निवडणूकांना सुरूवात
वाशीम जिल्ह्यातील 287 ग्राम पंचायतच्या सरपंच आणि 2325 सदस्य पदासाठी निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगणार असून त्याकरिता इच्छुक उमेदवारानी अर्ज भरण्यासाठी एकचं दिवस बाकी असल्याने इच्छुकांनी तहसील परिसरात एकच गर्दी केली आहे. ऑनलाइन अर्ज भरतांना वेबसाईटवर तांत्रिक अडचणी येत असल्याने ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होत असल्यामुळे इच्छुक उमेदवार नामनिर्देशाकरिता निराशा होत होती मात्र आता प्रशासनाने इच्छुक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहू नये व त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून आयोग नामनिर्देशनपत्र पारंपारिक पध्दतीने ऑफलाईन स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली असल्याने नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ उद्या सायंकाळी 5:30 पर्यंत वाढविण्यात आल्याने इच्छुक उमेदवारांनी समाधान व्यक्त केलं आहे.
रायगड जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. जिल्ह्यात 240 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या (2 डिसेंबर) शेवटचा दिवस असल्याने आज अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची अक्षरशः झुंबड उडाली होती. निवडणूक आयोगाचा सर्व्हर डाऊन असल्याने ऑनलाईन अर्ज भरताना अडथळे येत होते. त्यामुळे इच्छुकांचा जीव कासावीस झाला होता. आता मात्र निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज दाखल करण्यास परवानगी दिल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला आहे.