Cold Weather in Maharashtra: सध्या नोव्हेंबर महिना (november) सरला असून आता थंडीची उब सगळीकडेच जाणवू लागली आहे. मागच्या महिन्यातही अनेक ठिकाणी थंडीनं (winter season in maharashtra) राज्यात डोकं वर काढलेलं होतं. आताही पुन्हा एकदा थंडीनं राज्यात रोज धरला असून पारा घसरून 9.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या विदर्भ आणि नागपूर (vidharbha - nagpur) परिसरात तसेच सांगली - सातारा (sangli - satara) परिसरात थंडीची लाट आली आहे. थंडी पडून लागल्यानं रात्री लोकं शेकोटी (shekoti) पटवू लागले आहेत. त्याचबरोबर सकाळी उठल्या उठल्याही शकोटो पटवून, उबदार कपडे (warm clothes) घालून लोकं त्यांच्या घरासमोर बसलेली दिसत आहेत. घराघरात गरमागरम पदार्थ शिजताना दिसत आहेत. तेव्हा राज्यात एकूण थंडीचे वारे वाहू लागल्यानं योग्य ती खबरदारीही घेतली जाते आहे. सध्या मुंबईतही (cold weather in mumbai) थंडी बऱ्यापैंकी जाणवू लागली आहे त्याचसोबत पुण्यातही थंडीही जोरदार सुरूवात झाली आहे. (maharashtra weather forecast news tempreture marks lowest as winter season blooms)
सध्या राज्यात सगळीकडेच थंडीला सुरूवात झाल्यामुळे नागपूर ते महाबेळश्वरपर्यंत तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तेव्हा लोणावळा, पुणे आणि सातारा या भागात फिरायला जाण्यासोबतच तुम्ही निफाड, महाबेळश्वरसारख्या पर्यायांचा वापर करू शकता. त्यामुळे विंटर डेस्टिनेशनसाठी (winter destination) अशा अनेक ठिकाणी तुम्हाला फिरण्याची संधी आहे. इथे स्टेकेशन आणि वर्केशेनच्याही सुविधा आहेत त्यामुळे तुम्हाला तुमचं ऑफिसचं काम करता करताही फिरता येईल. केवळ फिरण्यासाठीच नाही तर काही प्रमाणात येथे फक्त निवांत वेळ घालवण्यासाठी तुम्ही फिरूही शकता.
हेही वाचा - सकाळी उठल्यानंतर 'ही' काम केल्यास लक्ष्मी देवी राहतील प्रसन्न; जाणून घ्या
गेल्या 7 ते 8 दिवसांपासून गायब झालेल्या थंडीचे पुन्हा जोरदार पुनरागमन झाल्याने निफाडचा पारा घसरला आहे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफाड तालुका पुन्हा गारठून निघाले आहे तालुक्यातील कुंदेवाडी (kudewadi) येथील गहू संशोधन केंद्राच्या हवामान विभागात (weather forecast department) 9.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे किमान तापमानाच्या पाऱ्यात घसरण झाल्याने निफाड करांना थंडीमुळे हुडहुडी भरली आहे या थंडीपासून ऊब (camp fire) मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहे तर उपदार कपडे परिधान करणे गरम पदार्थ सेवन केले जात आहेत.
सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे.सातारा शहराचा पारा 16 अशांवर खाली आला आहे.तर थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर (mahabaleshawer) आणि पाचगणी भागात देखील थंडी वाढली आहे. महाबळेश्वरचा पारा 12 अशांवर आला आहे.गेल्या आठवड्यात अचानक झालेल्या पावसामुळे थंडी गायब झाली होती मात्र दोन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा थंडी (cold weather) वाढू लागली आहे.
जळगाव जिल्ह्याची ओळख उष्ण जिल्हा म्हणून आहे जळगाव जिल्ह्यात उन्हाळा (hot weather) हा अत्यंत तीव्र असतो मात्र पावसाळ्यानंतर आता हिवाळ्याला सुरुवात झाल्यामुळे जळगावत थंडीचा जोर वाढू लागला आहे त्यामुळे जळगावचे नागरिक रस्त्यावर गरम कपडे घालून फिरताना दिसत आहेत तसेच हिवाळ्यात व्यायाम करणाऱ्यांचा प्रमाण देखील वाढले आहे.