अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातून मध्यप्रदेशात युरिया खताची तस्करी करणा-यांचा पर्दाफाश करण्यात आला. बेनोडा पोलिसानी ट्रक सह 240 खतांची पोती जप्त केली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृषी विभागाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल करून ट्रक चालकाला अटक केली. 45 किलो वजनाच्या 240 युरिया खताची पोती जप्त करण्यात आली. राज्यात युरियाची टंचाई आहे, त्यामुळे खताला सध्या चांगलाच भाव आला आहे.


यामुळे या तस्कराने खतांचा काळाबाजार सुरू केला. याप्रकरणी रामगोपाल कन्हैयालाल उरीया आठनेर सह मलकापूर येथील अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


बुलढाणा इथून खतं रोखीने खरेदी करून मध्यप्रदेशात नेत होते. ट्रक चालक मालक रामगोपाल कन्हैयालाल उरीया यांनी सदर युरिया खत मलकापूर येथून आणून मध्यप्रदेशात विक्रीला जात असल्याचे चौकशीदरम्यान सांगितले.