मुंबई : सगळीकडे लग्नाचा मौसम असताना कोल्हापूरात एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. 25 एप्रिल रोजी महेश सूर्यवंशी या तरूणासोबत विवाहबद्ध झालेल्या नववधुने लग्नाच्या 12 व्या दिवशीच माहेरी बाधरूममध्ये गळफास लावून घेतला आहे. त्रिमूर्ती कॉलनी कळंबा कोल्हापूर येथे राहणारी शिवानी चौगले या नवविवाहितेने गळफास लावून घेतला आहे. या प्रकारामुळे शिवानीच्या माहेरच्यांना आणि सासरच्या मंडळींना मोठा धक्का बसला आहे. 


कुठे आणि कसा घडला हा प्रकार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, झारी काम करणारा हा 21 वर्षीय नववर महेश सूर्यवंशी याचा सतीश चौगले यांच्या मुलीशी शिवानीशी लग्न झालं होतं. दोन्ही कुटुंबियांच्या पसंतीने हे लग्न 25 एप्रिल रोजी धुमधडाक्यात पार पडलं होतं. 5 दिवस लग्नानंतर सासरी राहिलेली शिवानी माहेरी गेली होती. तसेच एक दिवशी शिवानी आणि महेश ज्योतीबाच्या दर्शनासाठी देखील गेले होते. 


का केली आत्महत्या 


दुसऱ्या दिवशी महेश नवविवाहित शिवानीला सासरी नेण्यासाठी येणार होता. त्या अगोदरच शिवानीने माहेरच्या बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. आंघोळीला गेलेली शिवानी तासभर बाहेर न आल्यामुळे आईने दरवाजा उघडला आणि तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. शिवानीला तातडीने सीपीआर रूग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं. 


या प्रकारामुळे परिसरात शांतता पसरली आहे. अवघ्या 12 व्या दिवशी नवविवाहितेने उचललेल्या या पावलामुळे अजूनही मंडळी एका धक्क्यात आहेत.