अरुण, मेहेत्रे, पुणे : धक्कादायक बातमी पुण्यातली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यात रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरू असल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रक्ताचा कर्करोग असलेल्या रुग्णाला देण्यात येत असलेल्या औषधात रबराचे तुकडे आढळून आले आहेत. पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये हा प्रकार उघडकीस आला. डेनिलाईट पी नावाच्या औषधात रबराचे बारीक बारीक तुकडे आढळल्याने FDA कडून या औषधाची विक्री थांबवण्यात आली. 


रबराचे तुकडे यामध्ये आले कसे? हे औषध देताना रुग्णालयाने औषध पाहिलं नव्हतं का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.


या औषधांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असं FDA नं म्हटलं आहे. आता पुढे काय कारवाई होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.