पुणे : पेस्ट कंट्रोलनंतर काळजी न घेतल्यामुळे एका दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात शोकाकुळ वातावरण आहे. घरात पेस्ट कंट्रोल करणं मजली दाम्पत्याला महागात पडलं आहे. पेस्ट कंट्रोलनंतर दारं-खिडक्या बंद करुन घरात बसल्यामुळे दोघांचा मृत्यू  झाला.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अविनाश आणि अपर्णा मजली असं या दाम्पत्याचं नाव असून बुधवारी संध्याकाळची ही घटना आहे. 64 वर्षीय अविनाश सदाशिव मजली आणि त्यांची 54 वर्षीय पत्नी अपर्णा अविनाश मजली यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. घरात पेस्ट कंट्रोल करून घेतल्यानंतर मजली दांपत्य नातेवाईकांकडे गेले होते. संध्याकाळी सातच्या दरम्यान ते घरात परत आले.


घरात आल्यानंतर ते टीव्ही पाहत बसले. या वेळी घराचे दार तसेच खिडक्या बंद होत्या. पेस्ट कंट्रोल चा विषारी गॅस घरात कोंडून असल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही. त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. दोघेही बेशुध्द पडले. साडेसातच्या दरम्यान त्यांची मुलगी घरी आली. दोघांना ती तातडीने हॉस्पिटलला घेऊन गेली. मात्र तोवर खूप उशीर झालेला होता. रस्त्यात वाहतूक कोंडी झाल्यानं ते हॉस्पिटल मध्ये वेळेत पोहोचू शकले नाहीत. त्यात त्यांचा मृत्यू झाला.



पुण्यातील बिबवेवाडीनगरातील गणेश विहार सोसायटीत हा प्रकार घडला. बुधवारी संध्याकाळी पेस्ट कंट्रोल केल्यानंतर या दाम्पत्याने काही काळ बाहेर थांबणं गरजेचं होतं. असं न करता या दाम्पत्याने घरात राहण्याचा निर्णय घेतला. यामुळेच या दोघांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.