Ghaziabad Crime:  गाझियाबादमध्ये ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. देशभर गाजत असलेल्या ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर प्रकरणाचे धागेसोरे ठाण्यातील मुंब्रा पर्यंत पोहचले आहेत. या प्रकरणात आता धक्कादायक अपडेट समोर आली. मुंबईजवळील मुंब्रा भागात 400 जणांचं धर्मांतर झाल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी हा गौप्य स्फोट केला आहे. 


धक्कादायक गौप्यस्फोट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाझियाबाद ऑनलाईन गेम धर्मांतर प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबईजवळील मुंब्रा भागात सुमारे 400 जणांचं धर्मांतर करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. गाझियाबादचे पोलीस आयुक्त निपुण अग्रवाल यांनी या माहितीची पुष्टी केली आहे. गुजरातहून आलेल्या एका फोन कॉलमध्ये तब्बल 400 जणांचं धर्मांतर करण्यात आल्याचा उल्लेख होता. याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे.


ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर 


गाझियाबादमध्ये, 30 मे रोजी सर्वप्रथम हे प्रकरण उघडकीस आले. ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर करण्यात आले. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफचे पथक मुंब्रा येथे दाखल झाले.  या प्रकरमातील मुख्य आरोपी शाहनवाज खानच्या शोधासाठी विशेष पथक मुंब्रा येथे आले.  शाहनवाज याचा कसून शोध सुरू असल्याची माहिती ठाणे पोलीस सूत्रांनी दिलीय. 


मुंब्रा येथे राहणारा मुख्य आरोपी फरार


मुंब्रा भागात शाहनवाज मकसूद खान हा बनावट युजर आयडी बनवून त्याच्या माध्यमातून तो तो गेम खेळण्यासाठी उपलब्ध करून देत होता. या गेम मध्ये हरलेल्या हिंदू मुलांना तो कलमा वाचायला सांगून इस्लाम कबुल करण्यास भाग पडत होता. त्यांना कलमा वाचल्यानंतर तुम्ही कधीही गेम हरणार असल्याचे अमिश दाखवत होता. मुंब्रा येथील देवरी पाडा येथे असलेल्या शाझिया इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शाहनवाज मकसूद खान नावाचा व्यक्ती आपल्या कुटुंबासह राहत होता. मात्र, सध्या तो फरार आहे.


असं उघडकीस आले धर्मांतराचे प्रकरण


गाझियाबादमधल्या 17 वर्षांच्या जैन धर्मीय मुलानं गुपचूप इस्लाम धर्माचा स्वीकार केला. त्याच्या घरच्यांना याबाबत काहीच कल्पना नव्हती. गाझियाबादच्या सेक्टर 23 मधल्या याच मशिदीत हा तरुण लपून छपून नमाज पढायला जायचा. हा मुलगा 5 वेळा जीमला जाण्याच्या बहाण्यानं गायब असायचा कुटुंबीयांनी चौकशी केली तेव्हा तो मशिदीला नमाज पढायला जात असल्याचं निदर्शनास आले. यानंतर जे सत्य समोर आले त्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.   मुस्लीम धर्म स्वीकारल्याची कबुली मुलाने दिली. यानंतर त्याच्या कुटुंबियांनी पोलिस तक्रार केल्यानंतर ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.