नाशिक : अत्यंत संतापजनक बातमी. कुटुंब नियोजनाचे (Family planning) टार्गेट पूर्ण करण्यासाठी शस्त्रक्रिया केलेल्या स्तनदा मातांना (Breastfeeding mothers ) कडाक्याच्या थंडीत (Extreme cold) रूग्णालयात फरशीवर झोपवण्याचा प्रकार उघड झाला आहे. (Breastfeeding mothers sleep on tiles after the surgery) त्र्यंबकेश्वर तालुक्यात ठाणापाडा (Thanapada) आणि शिरसगाव या आरोग्य केंद्रांवर (Shirasgaon Health Centers) हा प्रकार घडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिरसगाव आरोग्य केंद्रात चाळीसहून अधिक शस्त्रक्रिया केलेल्या स्तनदा महिलांना चक्क थंडगार फरशीवर झोपविण्यात आले होते. हा सगळा संतपाजनक प्रकार 'झी 24 तास'ने उघड केला आहे. अत्यावश्यक सेवेची कोणतीही सोय नसताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने हा धक्कादायक प्रकार केला. विशेष म्हणजे शस्त्रक्रिया झाल्यानंतर 25 बाय 25च्या खोलीत कोंडवाड्याप्रमाणे या महिलांना ठेवण्यात आले. 


'झी २४ तास'च्या हाती या धक्कादायक आणि संतापजनक प्रकाराची व्हिज्युअल्स उपलब्ध आहेत. यात कशाप्रकारे महिलांना आरोग्य केंद्रात रात्रभर प्रचंड थंडीत झोपवण्यात आले, हे स्पष्ट दिसून येत आहे. कुटुंब नियोजनाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी या स्तनदा मातांच्या जिवाशी खेळ कऱण्याचा संतापजनक प्रकार करण्यात आला आहे. दिवसभर या महिलांकडे कोणी नंतर लक्ष दिले नसल्याने जिल्हा परिषद सदस्य रुपाली माळेकर यांनी आरोग्य विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.