पुणे : पुण्यात हिट अँड रनची (Hit and Run) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका व्यक्तीच्या अंगावर कारचालकाने गाडी घातल्याचा धक्कादायक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धक्कादायक म्हणजे दिवसढवळ्या घटलेल्या या घटनेकडे नागरिकांनीही दुर्लक्ष केल्याचं या व्हिडिओत दिसतंय. ये जा करणाऱ्या लोकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय आहे प्रकरण?
पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरात 20 एप्रिलला ही घटना घडली होती. त्यानंतर तब्बल चार दिवसांनंतर आरोपीवर गुन्हा दाखल झाला. एक व्यक्ती रस्त्यात झोपला होता. कार चालकाने गाडी थेट त्याच्या अंगावर घातली. यात गाडीची चाकं त्या व्यक्तीच्या डोक्यावरुन जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. 



या घटनेत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीच्या शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे पसार झालेल्या कार चालकाचा शोध घेत त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर लगेचच जामिनावर त्याची सुटकाही करण्यात आली.