आफताबचेही 35 तुकडे करा; श्रद्धाच्या क्रूर हत्येनंतर संतप्त मागणी
श्रद्धाचे तुकडे करणाऱ्या आफताबचेही 35 तुकडे करावे अशी मागणी श्रद्धाच्या मित्र परिवाराकडून होत आहे.
प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई : दिल्लीत अतिशय निर्घृणपणे झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाने(Shraddha Murder Case) संपूर्ण देश हादरला आहे. श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आफताबने(Accused Aaftab) तिची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि ते महरौली जंगलात फेकले(Mehrauli Forest) . हे धक्कादायक हत्याकांड उघडकीस आल्यानंतर आफताब विरोधात प्रचंड चीड आणि संताप व्यक्त केला जात आहे. श्रद्धाची निर्दयीपणे हत्या करणाऱ्या आफताबचेही 35 तुकडे करा अशी संतप्त मागणी केली जात आहे. आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी श्रद्धाच्या पालकांनी केली आहे.
श्रद्धाने पत्रकारितेचं शिक्षण घेतल होते
वसईत राहणाऱ्या श्रद्धा वालकर या 28 वर्षीय तरुणीची तिचाच प्रियकर आफताब पुनावाला याने हत्या केली. श्रद्धाने पत्रकारितेचं शिक्षण घेतले असून ती शांत स्वभावाची होती.
दिल्लीत जाण्याआधी श्रद्धा आणि आफताब वसईत राहत होते
श्रद्धा आणि आफताब हे दिल्लीत जाण्याआधी वसईच्या नायगाव परिसरात राहत होते. मात्र, तेथेही राहत असताना ते आपली माहिती लपवत होते असे श्रद्धाचे मित्र सांगत आहेत. श्रद्धाचे तुकडे करणाऱ्या आफताबचेही 35 तुकडे करावे अशी मागणी श्रद्धाच्या मित्र परिवाराकडून होत आहे.
आफताबने गाठला क्रूरतेचा कळस
संपूर्ण देशाला हादरवून टाकणा-या श्रद्धा वालकर हत्याकांडात धक्कादायक एकापाठोपाठ एक धक्कादाय खुलासे समोर येत आहेत. आफताब आणि श्रद्धा दोघेही लिव्ह इनमध्ये राहत होते. दोघांचेही धर्म वेगळे. श्रद्धानं घरच्यांच्या विरोध जुगारुन आफताबवर विश्वास ठेवला आणि दिल्लीत रहायला गेली. मात्र, आफताबने तिची निर्घृणपणे हत्या केली आणि त्यानंतर तिचे 35 तुकडे केले. हे तुकडे फ्रिजमध्ये ठेवून तो रोज महरौली जंगलात हे तुकडे फेकत होता. श्रद्धाच्या हत्यानंतरही हा नराधम निर्धास्तपणे अनेक मुलींना डेट करत असल्याची माहिती समोर आलेय.