Shirdi VIP Darshan Scam : साईमंदिर परिसरात सुरु असलेला गोरखधंदा बंद होणार, या लोकांना मंदिर परिसरात No Entry
Shirdi Bogus Agent VIP Darshan Scam : आमदार, खासदारांचे पीए असल्याचं सांगत साई मंदिरात दर्शनासाठी मोठा घोटाळा सुरु होता, या घोटाळ्यावर आता बंदी येणार आहे
कुणाल जमदाडे, झी मीडिया, शिर्डी : साईबाबांचं व्हीआयपी दर्शन घडवून देणारे एजंट आणी बोगस पिएंना आता चाप (Shirdi Bogus Agent VIP Darshan Scam) बसणार आहे. आमदार खासदार विश्वस्त यांचे बोगस पीए आणि एजंट (Fake Agent and PA) यांना साईमंदिर (Sai Baba Temple) परीसरात नो एन्ट्री केली करण्यात आलीय. साईदर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना व्हीआयपी दर्शन (Sai Baba VIP Darshan) घडवून देण्याच्या नावाखाली अनेक पीएचे आर्थिक लागेबांधे असल्याचं निदर्शनास आल्याने साई मंदिरात बोगस पीए यांना नो एन्ट्री देण्याचा साईसंस्थानने कठोर निर्णय घेतला आहे. (No entry to bogus PA and Engats in Sai Mandir Area)
शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो साईभक्त येत असतात. सामान्यांपासून नेते अभिनेते उच्चपदस्थ अधिकारी साईदरबारी हजेरी लावत असतात. अती महत्वाच्या व्यक्तींसाठी साईबाबा संस्थान व्हिआयपी दर्शन व्यवस्था करत असते. यातूनच आता गोरखधंदा सुरू झाल्याचं समोर आलं आहे. आजी माजी मंत्री , विश्वस्त यांनी आपल्या स्विय सहायकाची शिर्डीत नेमणूक केलेली आहे. मात्र त्यांच्याकडून गोरखधंदा सुरू झाल्याचं साईमंदिर प्रशासनाच्या निदर्शनास आलं आहे. आजी माजी मंत्री आमदार, विश्वस्तांना आता आपल्या पीएच्या नियुक्तीचे अधिकृत पत्र साईसंस्थानला (Sai Sansthan) द्यावे लागणार आहे..
तर साईसंस्थान करणार कारवाई -
साईमंदिरात असणाऱ्या पिआरओ ऑफिसमधून अतीमहत्वाच्या व्यक्तींना पेड व्हिआयपी पास दिला जातो आणी झटपट दर्शन घडवून दिले जाते. मात्र अनेकजण अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या नावाने बोगस शिफारस देऊन पास मिळवतात आणि आपला गोरखधंदा चालवत आहेत.. त्यामुळे आता दोन दिवस अगोदर शिफारस करणाऱ्यालाच व्हिआयपी पास देण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतलाय. यामुळे आर्थिक संबधातून विक्रि होणाऱ्या पासला पायबंध बसणार आहे .मंदिर परिसरात बोगस पीए फिरकले तर त्यांच्यावर साई संस्थानकडून कठोर कारवाई करण्यात येईल असं साई संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितलं.