गणेशोत्सवाचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष, भक्तांचा उत्साह शिगेला
श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गणेशाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच लगबग आहे.
पुणे : श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गणेशाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच लगबग आहे.
पुण्यात सार्वजनिक गणपतींचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरं होतंय, त्यानिमित्तानं विशेष उत्साह आहे... त्यातच यावर्षी दगडूशेठ आणखी शोभून दिसतोय. तब्बल ४० किलो सोन्याच्या अलंकारांचे दागिने दगडूशेठसाठी घडवण्यात आलेत.
पुण्यातही गणरायाच्या स्वागताला पावसानं हजेरी लावलीय..... पुण्यात रिमझिम पाऊस आहे. त्यामुळे गणेशभक्तांचा उत्साह आणखीनच वाढलाय.... पावसात ढोलपथकांचं वादन जोरदार सुरू आहे.