श्रीकांत देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
प्रसिद्ध मराठी कवी श्रीकांत देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालाय. त्यांच्या ‘बोलावे ते आम्ही’ या काव्य संग्रहास 2017 या वर्षासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालाय.
मुंबई : प्रसिद्ध मराठी कवी श्रीकांत देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालाय. त्यांच्या ‘बोलावे ते आम्ही’ या काव्य संग्रहास 2017 या वर्षासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालाय.
पुरस्काराचं स्वरूप
1 लाख रूपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. रवींद्र भवनस्थित साहित्य अकादमीच्या मुख्यालयात आज साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील 24 प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात सर्वोत्कृष्ट पुस्तकांची घोषणा यावेळी करण्यात आली. तर सुजाता देशमुख यांना अनुवादासाठी पुरस्कार देण्यात आलाय.
अनुवादित 'गौहर जान म्हणतात मला' या पुस्तकास उत्कृष्ट अनुवादाच्या पुरस्कार जाहीर झाला आहे. 'माय नेम इज गौहर जान' या विक्रम संपथ लिखित इंग्रजी पुस्तकाचा तो अनुवाद आहे. 50 हजार रुपये रोख ,ताम्रपट असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कधी मिळणार पुरस्कार
12 फेब्रुवारी 2018रोजी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिध्द साहित्यिक श्री संजय पवार, श्रीमती पुष्पा भावे आणि श्री सदानन्द मोरे यांचा समावेश होता.