मुंबई : आज कारगिल विजयाला आज २० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त द्रास-कारगिलमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कारगिल विजयाची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी २६ जुलै रोजी हा दिवस साजरा केला जात आहे. धार्मिक कार्यक्रमांबरोबर विविध सामाजिक उपक्रमांना सढळहस्ते मदत करणाऱ्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने आता आणखी एक सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. सिद्धीविनायक मंदीर न्यासतर्फे यानिमित्त एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहिद जवानांच्या मुलांचा केजी टु पीजी असा खर्च सिद्धीविनायक न्यासतर्फे उचलण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाची शान असलेल्या हिंदुस्थानी लष्करातील महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या मुलांचा ‘केजी टू पीजी’पर्यंतचा शैक्षणिक खर्च मंदिर न्यास उचलणार आहे. नुकत्याच झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. देशात आज साजऱ्या होणाऱ्या कारगिल विजय दिनानिमित्ताने मंदिर न्यासाच्या या निर्णयाला वेगळा आयाम मिळाला आहे. यापुढे महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या मुलांच्या ‘केजी टू पीजी’ शिक्षणाचा खर्च उचलण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. .युद्धात जायबंदी झालेल्या जवानांसाठी पुण्यात कार्यरत असलेल्या ‘क्वीन मेरी’ या संस्थेला सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने 25 लाखांचा धनादेश सोपवण्यात आला. यावेळी न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर आणि विश्वस्त उपस्थित होते.



सीमेवर लढणारे जवान आपल्या सर्वांचे रक्षण करत असतात म्हणून आपली जवानांच्या कुटुंबाप्रती ही जबाबदारी असल्याचे सिद्धविनायक न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी झी 24 तास' ला सांगितले. शहिद जवानांच्या मुलांच्या केजी टु पीजी चा खर्च सिद्धिविनायक न्यासने करण्यात येईल असे ते म्हणाले.