सिंधुदुर्ग : Nitesh Rane Case : भाजप आमदार नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane ) यांची जामीनावर आज सुटका झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने आज जामिनावर निकाल दिला. दरम्यान, राणे यांना जामीन मिळणार का, याची उत्सुकता होती. अखेर त्यांना आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Court grants bail to Nitesh Rane) त्यामुळे ते जेलमधून बाहेर येणार आहेत.  दरम्यान, नितेश राणे यांची तब्बेत बिघडली होती. त्यांच्यावर कोल्हापूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (MLA Nitesh Rane's health deteriorated)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याआधी नितेश राणे यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला आहे. रात्री तीन वाजल्यापासून उलट्या होत असल्याने नितेश राणे हैराण झाले आहेत. नितेश राणे यांच्यावर कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  दरम्यान, त्यांना जामीन मंजूर झाल्याने कार्यकर्त्यांत उत्साह दिसून येत आहे. गेले अनेक दिवस त्यांना जामीन मिळणार का, याची उत्सुकता होती. दरम्यान, साक्षीदारांवर दबाव आणता येणार नाही. तसेच पोलीस ठाण्यात हजेरी या अटीवर न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. 


संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या  नितेश राणे यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला. 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर राणे यांचा हा जामीन मंजूर झाला. नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांनाही जामीन मिळाला आहे.



आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर वकिल, ज्येष्ठ वकील सतीश मानशिंदे, वकील संग्राम देसाई यांनी युक्तिवाद केला होता. तर सरकारी पक्षाच्यावतीने वकील प्रदीप घरत, अॅड. साळवी यांनी युक्तिवाद केला होता. त्यानंतर युक्तीवादानंतर न्यायालयाने आज जामीन अर्जावर निर्णय दिला.


सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्यावेळी शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे वादाच्या भोवर्‍यात सापडलेत. त्यांच्यावर या हल्ल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे त्यांचाच हात आहे. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर कारमधून आलेल्या दोघांनी हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.